शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या ‘टीम’मधून अकोला बाद

By admin | Updated: June 12, 2015 17:44 IST

प्रदेश स्तरावर अकोला भाजपला प्रतिनिधित्वच नाही.

अकोला- भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी गुरुवारी मुंबईत जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत अकोल्याला मात्र प्रतिनिधित्व मिळाले नाही. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर खा. दानवे यांच्याकडील मंत्रिपद काढून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या नव्या कार्यकारिणीबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता गुरुवारी संपली असली तरी अकोल्यातील भाजप नेत्यांची मात्र निराशा झाली. प्रदेश कार्यकारिणीवर सातत्याने अकोल्यातील नेत्यांची नियुक्ती होत आली आहे; दानवे पाटलांच्या ह्यटीमह्णमधून मात्र अकोला बाद झाले. यापूर्वीच्या कार्यकारिणीत डॉ. रणजित पाटील यांच्याकडे सरचिटणीसपद सोपविण्यात आले होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाल्यानंतर पक्षसंघटनेच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात येणार, हे निश्‍चित होते. त्यांच्या जागी प्रदेश कार्यकारिणीत कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांंचे लक्ष लागले होते. दानवे पाटलांनी त्यांची टीम गुरुवारी जाहीर केली तेव्हा त्यात अकोल्याला प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. अकोल्याचे शेजारी अमरावती आणि बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांना प्रदेश कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाले आहे. उपाध्यक्ष म्हणून आ. चैनसुख संचेती यांना कायम ठेवण्यात आले तसेच अमरावती जिल्ह्यातून नुकतेच भाजपवासी झालेले डॉ. सुनील देशमुख यांनाही उपाध्यक्षांमध्ये जागा मिळाली. अकोल्यातील ज्येष्ठ नेत्यांना मात्र प्रदेश कार्यकारिणीपासून दूर ठेवण्यात आले आहे.