१० आठवडे उलटूनही अनेकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:20+5:302021-05-07T04:19:20+5:30

ग्रामीण भागातील केंद्र होते बंद ग्रामीण भागातील नागरिकांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसऱ्या डोसची व्यवस्थाच करण्यात आली नाही. अनेक ...

After 10 weeks, many did not receive a second dose of covacin! | १० आठवडे उलटूनही अनेकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळेना!

१० आठवडे उलटूनही अनेकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळेना!

ग्रामीण भागातील केंद्र होते बंद

ग्रामीण भागातील नागरिकांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसऱ्या डोसची व्यवस्थाच करण्यात आली नाही. अनेक केंद्रे गुरुवारपर्यंत बंद होती. त्यामुळे सहा आठवडे उलटून गेलेल्यांच्या दुसऱ्या डोसचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोविशिल्डचे ७० टक्के डोस दुसऱ्या डोससाठी राखीव

कोविशिल्ड लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी ७० टक्के साठा हा दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय, येत्या आठवडाभरात कोव्हॅक्सिन उपलब्ध होणार आहे. यातील बहुतांश साठा देखील दुसऱ्या डोससाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे.

लसीकरणाचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तरी घाबरण्याचे काम नाही. येत्या आठवडाभरात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होणार आहे. उपलब्ध लसीचा बहुतांश साठा हा दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात येत आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकाेला

Web Title: After 10 weeks, many did not receive a second dose of covacin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.