अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा; नंदुरबार वकील संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:43 IST2018-11-23T13:43:07+5:302018-11-23T13:43:50+5:30

अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती अ‍ॅडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी नंदुरबार वकील संघ व औरंगाबाद ज्युनिअर वकील संघात सामना झाला. यामध्ये नंदुरबार संघाने १२ धावांनी सामन्यावर विजय मिळविला.

 Advocate Cup Cricket Tournament; Nandurbar lawyers team won | अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा; नंदुरबार वकील संघ विजयी

अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा; नंदुरबार वकील संघ विजयी


अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती अ‍ॅडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी नंदुरबार वकील संघ व औरंगाबाद ज्युनिअर वकील संघात सामना झाला. यामध्ये नंदुरबार संघाने १२ धावांनी सामन्यावर विजय मिळविला.
नंदुरबार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत १२७ धावा केल्या. यामध्ये चंदू वाळवी यांनी २७ धावांचे योगदान दिले. माणिक पाडवी याने ३३ धावा आणि औरंगाबादचे ३ गडी बाद केल्याने सामनावीर ठरला. औरंगाबाद संघाकडून कीर्तीकुमार याने सामन्यात ३५ धावा आणि २ गडी बाद केले. सामन्यात पंच म्हणून राजेश दुधगम, विकी ठाकूर यांनी काम पािहले. सागर आडोळे यांनी गुणलेखन केले. मैदान गडी सचिन देशमुख होते. शुक्रवारी उपांत्यफेरीत प्रवेशाकरिता नंदुरबार संघाचा सामना नगर वॉरिअर संघासोबत आहे.
उपांत्यफेरीत सध्या अकोला वकील संघ अ, अकोला वकील संघ ब आणि अंबाजोगाई वकील संघांनी प्रवेश मिळविला आहे. नंदुरबार व औरंगाबाद संघातील सामना समाप्तीनंतर सामनावीर पुरस्कार माणिक पाडवीला देण्यात आला. यावेळी अ‍ॅड़ प्रवीण तायडे, रू पेश इस्तापे, अ‍ॅड़ शंकर ढोले, अ‍ॅड़ संतोष वाघमारे, अ‍ॅड. दिनेश चहाकार, अ‍ॅड़ सुनील देशमुख, सतोष इंगळे, विजय आठवले, दीपक पाटील, डेनिस अघमकर, राहुल शेगोकार, प्रफुल्ल भारसाकळे, ज्ञानेश उमरकर, वैभव घुगे, सागर डवरे, अमोल क्षीरसागर व राहुल वानखडे उपस्थित होते, अशी माहिती अ‍ॅड़ अजय लोंढे यांनी दिली.
 

 

Web Title:  Advocate Cup Cricket Tournament; Nandurbar lawyers team won

टॅग्स :Akolaअकोला