अकोला मनपा शिक्षकांच्या बदल्या नव्हे समायोजन

By Admin | Updated: August 28, 2014 01:46 IST2014-08-28T01:26:49+5:302014-08-28T01:46:26+5:30

४0 शिक्षकांचे समायोजन; उपायुक्तांची मंजुरी

Adjustment of Akola Municipal Teacher Transfers | अकोला मनपा शिक्षकांच्या बदल्या नव्हे समायोजन

अकोला मनपा शिक्षकांच्या बदल्या नव्हे समायोजन

अकोला : महापालिकेच्या शाळेत २0 ते २४ वर्षांपासून ठाण मांडणार्‍या शिक्षकांच्या बदल्या नव्हे तर ह्यऑनलाईनह्ण प्रणालीद्वारे वेतन देण्यासाठी त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. त्यानुषंगानेच बुधवारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी ४0 शिक्षकांच्या समायोजनावर शिक्कामोर्तब केले.
शासनाने राज्यातील जिल्हा परिषद व महापालिकांमधील शिक्षकांचे वेतन ह्यऑनलाईनह्ण (शालार्थ वेतन) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. याकरिता डिसेंबर महिन्यात मनपातील सर्व सेवानवृत्त व कार्यरत कर्मचार्‍यांची ह्यऑनलाईनह्ण माहिती शासनाकडे पाठवण्यात आली. ही प्रक्रिया तूर्तास अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांच्या खात्यामध्ये ५0 टक्के रक्कम जमा होईल.
ह्यऑनलाईनह्ण प्रक्रियेसाठीच मनपा शाळेत अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचे समायोजन करणे क्रमप्राप्त असल्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण विभागाला दिले. ३0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, या नियमानुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली. यामध्ये ४0 शिक्षकांचे समायोजनाला उपायुक्त चिंचोलीकर यांनी हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे.

Web Title: Adjustment of Akola Municipal Teacher Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.