अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारपासून

By Admin | Updated: April 3, 2017 02:42 IST2017-04-03T02:42:40+5:302017-04-03T02:42:40+5:30

अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

Adjustment of additional teachers from Wednesday | अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारपासून

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारपासून

अकोला, दि. २- २0१६ व १७ च्या संच मान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजनेचे वेळापत्रक शिक्षक आयुक्तांनी जाहीर केले असून, अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ अंतर्गत इयत्ता नववी व दहावीची तुकडी व्यवस्था बंद केली असून, प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्गात ३0 विद्यार्थी व उच्च प्राथमिक शाळेतील प्रत्येक वर्गात ३५ विद्यार्थी आणि नववी व दहावीत प्रत्येकी ४0 विद्यार्थी संख्या निश्‍चित करण्यात आली. विद्यार्थी संख्या कमी होत असल्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरतात. सुधारित संच मान्यता निकषानुसार २0१६ व १७ ची प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेची संच मान्यता प्रक्रिया करण्यात आली असून, या संच मान्यतेमध्ये विद्यार्थी पटसंख्येचे निकष लावल्यामुळे अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समायोजनाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयनिहाय रिक्त जागा याची माहिती शिक्षण संस्था, मुख्याध्यापिकांना सादर करण्यास सांगितले आहे. शिक्षण संस्थेने माहिती न दिल्यास मुख्याध्यापकाने माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयानुसार रिक्त जागा व्यवस्थापनाने घोषित करण्यापूर्वी शाळांतर्गत व संस्थांतर्गत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि शिक्षणाधिकार्‍यांनी संस्थेकडून जाहीर केलेल्या व मान्यता दिलेल्या अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनद्वारे समायोजन पोर्टलवर भरावी, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ५ ते १0 एप्रिलपर्यंंंंत संस्थांनी सर्व बाबींची पूर्तता करून शिक्षक संवर्गाची १ जानेवारी २0१७ रोजी सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून अतिरिक्त शिक्षक निश्‍चित करून शाळा, संस्थेंतर्गत समायोजन करावे. १0 ते २२ एप्रिलपर्यंंंत संस्थेकडील अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषयनिहाय रिक्त पदांसाठी शिक्षणाधिकार्‍यांची मान्यता द्यावी आणि १७ ते २६ एप्रिलपर्यंंंंत शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांनी तक्रारींचे निराकरण करावे, २९ एप्रिलपर्यंंंंत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करावी आणि ५ मे रोजी संस्था, शाळांनी अतिरिक्त शिक्षकांची आरक्षण व विषयनिहाय रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: Adjustment of additional teachers from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.