शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

सुनावणीमुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 2:45 PM

अकोला : जिल्ह्यातील ६६ अतिरिक्त शिक्षकांचे शनिवारी शाळांमध्ये समायोजन होणार होते; परंतु अतिरिक्त शिक्षकांनी नोंदविलेल्या हरकतींवर सुनावणीच संपली नसल्यामुळे ...

अकोला: जिल्ह्यातील ६६ अतिरिक्त शिक्षकांचे शनिवारी शाळांमध्ये समायोजन होणार होते; परंतु अतिरिक्त शिक्षकांनी नोंदविलेल्या हरकतींवर सुनावणीच संपली नसल्यामुळे शिक्षकांचे समायोजन लांबणीवर पडले आहे. समायोजन करण्याची तारीख शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ५३ शाळांमधील मराठी व उर्दू माध्यमांचे एकूण १0९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त ठरविल्यामुळे या शिक्षकांना हरकती, आक्षेप नोंदविण्याची २९ व ३0 नोव्हेंबर रोजी संधी दिली होती. यात अनेक शिक्षकांनी संस्था चालकांनी जाणीवपूर्वक अतिरिक्त ठरविले. सेवाज्येष्ठ असतानाही कनिष्ठ शिक्षकाला वाचविण्यासाठी अतिरिक्त ठरविले. या प्रकारच्या हरकती नोंदविल्या. या हरकतींवर सुनावणी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना दोन दिवस लागत असल्यामुळे १ डिसेंबर रोजी होणारे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया तूर्तास लांबणीवर पडली आहे. शिक्षकांच्या हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. अतिरिक्त ठरल्यामुळे कोणती शाळा मिळते, या चिंतेने शिक्षकांची झोप उडाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर समायोजनाची प्रक्रिया आटोपावी, असे शिक्षकांना वाटत आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर केल्यावर रिक्त पदे असलेल्या शाळांचीसुद्धा यादी शिक्षणाधिकाºयांनी प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकाºयांनी ६२ शाळांची यादी उघड केली आहे. ही यादी मिळाल्यामुळे शिक्षकांना कोणत्या शाळेत कोणत्या आरक्षणाची आणि विषयाची पदे रिक्त आहेत, याची माहिती मिळणार आहे.रिक्त पदे असलेल्या शाळासमर्थ विद्यालय गायगाव (१ पद), लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट (२), खोटरे विद्यालय सिरसोली (१), जनता विद्यालय दानापूर(१), सेंट अ‍ॅन्स मूर्तिजापूर(१), कस्तुरबा गांधी विद्यालय हिवरखेड(१), विद्याभारती हायस्कूल शेलूबाजार, गजानन विद्यालय अकोली जहा., स.ल. शिंदे विद्यालय सस्ती, चौधरी विद्यालय अकोला, भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर(३), सरस्वती विद्यालय मलकापूर, लालबहादूर शास्त्री विद्यालय बपोरी, भोपळे विद्यालय हिवरखेड, समता विद्यालय अकोला, इंगोले विद्यालय कानशिवणी, जागृती विद्यालय(२) प्राजक्ता विद्यालय अकोला, डीआर पाटील विद्यालय अकोला, जवाहर विद्यालय जामठी मूर्तिजापूर, मनूताई कन्या शाळा अकोला, वसंतराव नाईक विद्यालय करोडी(२), वसंतराव नाईक विद्यालय रौंदळा, विठ्ठल रुख्माई विद्यालय निंभा मूर्तिजापूर, बाबासाहेब नाईक विद्यालय सावरगाव(२), प्रियदर्शनी इंदिरा गांधी विद्यालय पातूर, सावंत विद्यालय शिर्ला, म. गांधी विद्यालय कापशी रोड, ज्ञानप्रकाश विद्यालय राजनखेड, रामु नाईक विद्यालय मळसूर, वसंतराव नाईक विद्यालय हातगाव, बंड विद्यालय खानापूर, बाबासाहेब सरनाईक विद्यालय(२), विवेकानंद विद्यालय मंगरूळ कांबे, दे.पा. विद्यालय घुंगशी, खंडेश्वर विद्यालय मोरड, सुगमचंद तापडिया विद्यालय शिवर, सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड, बाळासाहेब भास्कर विद्यालय म्हैसांग (३), सर्वोदय विद्यालय अकोला, भारत विद्यालय अकोला, धनाबाई विद्यालय बाळापूर, प्रतिभा तिडके विद्यालय दुर्गवाडा, श्रीराम विद्यालय, अकोला, भारत विद्यालय (२) अकोला, जिजाऊ कन्या विद्यालय अकोला, धनाबाई विद्यालय बाळापूर (५), जागेश्वर विद्यालय (७), डीपीएस विद्यालय पिंपळखुटा, भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट (३), नितीन विद्यालय भटोरी, होलिक्रॉस कॉन्व्हेंट अकोला (४), श्रीराम विद्यालय, विवेकानंद विद्यालय बळेगाव, समर्थ विद्यालय गायगाव, सरस्वती विद्यालय, सार्वजनिक विद्यालय चोहोट्टा बाजार, नंदकिशोर विद्यालय पुंडा, लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट, बाळासाहेब खोटरे विद्यालय सिरसोली, जनता विद्यालय दानापूर, वसंतराव नाईक विद्यालय नांदखेड अकोट (२)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक