शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आधार ‘लिंक’साठी ७६३ शेतकऱ्यांचा मिळेना पत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:08 IST

बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही.

- संतोष येलकरअकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी १७ फेबु्रवारीपर्यंत १ लाख ११ हजार ६१६ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहे. उर्वरित ७६३ शेतकºयांचा पत्ता मिळत नसल्याने त्यांचे बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांचा शोध घेण्याचे काम महसूल विभागाकडून सुरूच आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत गत दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ३७९ शेतकºयांपैकी १ लाख ११ हजार ६१६ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम १७ फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित ७६३ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित शेतकºयांचा महसूल विभागाकडून शोध घेण्यात येत आहे; मात्र संबंधित शेतकºयांचा पत्ता अद्याप मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या मात्र पत्ता मिळत नसलेल्या ७६३ शेतकºयांचा शोध घेण्याचे काम महसूल विभागाकडून सुरूच आहे.कर्जमाफीचा लाभ मिळणार कसा?कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यातील पात्र शेतकºयांपैकी ७६३ शेतकºयांचा शोध घेऊनही पत्ता मिळाला नसल्याने, त्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार कसा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी ज्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही, अशा शेतकºयांचा पत्ता मिळविणे आणि त्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी