अकोला एमआयडीसीत भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 06:05 IST2018-02-05T06:05:31+5:302018-02-05T06:05:44+5:30

अकोला एमआयडीसी क्रमांक तीनमधील आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लिमिटेड या कंपनीला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली.

Acura MIDC fire | अकोला एमआयडीसीत भीषण आग

अकोला एमआयडीसीत भीषण आग

अकोला - अकोला एमआयडीसी क्रमांक तीनमधील आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लिमिटेड या कंपनीला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले असून पहाटे ३.४५ वाजतार्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
प्राप्त माहीतीनुसार, रविवारी रात्री दोन वाजतानंतर आश्लेषा पॉवर कंट्रोल कंपनीला अचानक आग लागली. या आगीने हळूहळू रौद्र रुप धारन केले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची माहीती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. कुंभारीचे माजी सरपंच रवी पोहनकर यांनी स्वत:च्या बोअरमधून आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस, अधिकारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी तळ ठोकून आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Web Title: Acura MIDC fire