हल्लेखोरांवर कारवाई होईल
By Admin | Updated: July 21, 2014 00:28 IST2014-07-21T00:28:04+5:302014-07-21T00:28:04+5:30
राकॉँ नेते देशमुख यांची ग्वाही ; अजय रामटेके हल्ला प्रकरण

हल्लेखोरांवर कारवाई होईल
अकोला: नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी गुलजारपुरा परिसरातील नागरिकांना दिले. मनपाचे गट नेते अजय रामटेके यांच्यावर ११ जुलै रोजी गोळीबार करण्यात आला होता. रविवारी अकोल्यात आलेल्या अनिल देशमुख यांनी रामटेके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अजय रामटेके यांची आई, पत्नी शीतल आणि बहीण पुष्पा राऊत यांच्यासह इतरही सदस्य उपस्थित होते. पोलिसांनी हल्लेखोरांना तातडीने अटक केली असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी पोलिस अधिकार्यांशी चर्चा केल्याचे देशमुख यांनी रामटेके यांच्या कुटुंबीयांना सांगितले. याप्रसंगी गुलजार पुरा परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.