सट्टाप्रकरणी सात जणांवर कारवाई

By Admin | Updated: March 28, 2016 01:33 IST2016-03-28T01:33:44+5:302016-03-28T01:33:44+5:30

पिंजर येथील कारवाई; आरोपींची जामिनावर मुक्तता.

Action on seven accused | सट्टाप्रकरणी सात जणांवर कारवाई

सट्टाप्रकरणी सात जणांवर कारवाई

पिंजर (जि. अकोला): येथील एका बियर बारमध्ये सट्टय़ाच्या साहित्यासह आलेल्या सात जणांविरुद्ध शनिवारी रात्री माना पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गोयल यांनी कारवाई केली. सात जणांना अटक करून नंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, माना पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार गोयल हे शनिवारी रात्री त्यांच्या सहकार्‍यांसह पिंजर येथे गस्तीवर आले. यावेळी त्यांच्यासोबत पिंजर ठाणेदार एस. पी. सोळुंके, डी. एन. फड हेदेखील होते. रात्री १२.३0 वाजता त्यांना येथील एक बियर बार उघडा असल्याचे दिसले. आत गेल्यावर त्यांना शैलेश जयस्वाल, ओमप्रकाश वानखडे, प्रशांत देशमुख, दिलीप इंगळे, दादाराव वानखडे, मकसुदखाँ पठाण, प्रशांत देशमुख संशयास्पद आढळून आले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे सट्टय़ाचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाइल फोन, सट्टय़ाचे साहित्य, रोख २८९0 रुपये व तीन मोटरसायकली असा ९९ हजार ९९0 रुपयांचा माल जप्त केला. यावरून पोलिसांनी यांच्याविरुद्ध ४, ५ जुगार अँक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अकोला येथे पाठविले. रविवारी त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

Web Title: Action on seven accused