शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी कृती कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:07 IST

अकोला : राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या वर्षीच्या संकलित चाचणी २ मध्ये सर्व प्राथमिक शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्हय़ात करण्यात येणार प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या वर्षीच्या संकलित चाचणी २ मध्ये सर्व प्राथमिक शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर १९ ते २५ जानेवारी या कालावधीत निश्‍चित करून गटशिक्षणाधिकार्‍यांनी त्यासाठी नियोजन करावे. यासोबतच तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती यांनी निश्‍चित करतील. तसेच जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी हे सुद्धा प्रत्येकी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्‍चित करतील. त्याची माहिती दिलेल्या संकेतस्थळावर त्याच दिवशी भरतील. स्तर निश्‍चितीची माहिती संबंधित वर्ग शिक्षकास देऊन माहिती शाळेच्या शेरेबुकात नोंद करावी. वर्गातील अप्रगत विद्यार्थ्यांचा अप्रगत विषयांसाठी (भाषा व गणित) कृती कार्यक्रम वर्गशिक्षक, विषय शिक्षकांनी तयार कारावा. यासह इतरही कृती कार्यक्रम ठरविण्यात आले आहे.

शाळांमध्ये पायाभूत चाचणी, संकलित परीक्षा १ घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षकांनी अध्ययन स्तर निश्‍चित करावा आणि त्यानंतर कृती कार्यक्रमाचे नियोजन करावे. आम्ही प्रत्येक शाळेतील एक शिक्षक प्रशिक्षित केलेला आहे. - डॉ. प्रकाश जाधव प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळाStudentविद्यार्थी