शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

अकोला जिल्ह्यात टंचाई उपाययोजनांची २८ टक्केच कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:11 AM

अकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणाºया गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आतापर्यंत टंचाईचा दुसरा टप्पा आटोपत आहे, त्यासाठी उपाययोजनांपैकी केवळ २८ टक्केच कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित ७२ टक्के कामांना येत्या काळात मंजुरी देऊन सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत, हे निश्चित.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणा-या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आतापर्यंत टंचाईचा दुसरा टप्पा आटोपत आहे, त्यासाठी उपाययोजनांपैकी केवळ २८ टक्केच कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित ७२ टक्के कामांना येत्या काळात मंजुरी देऊन सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत, हे निश्चित.नेहमीप्रमाणे चालू वर्षातही ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने २०१७-१८ मध्ये उन्हाळ्यासाठी पाणी टंचाई आराखडा तयार केला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात-२५९, दुसरा टप्पा-२३३, तिसरा टप्प्यात-७१ गावांमध्ये पाणी टंचाईचा अंदाज व्यक्त झाला, त्यानंतर झालेल्या सुधारणेनुसार ५३४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा अंतिम झाला. त्यातील पहिल्या टप्प्यातील उपाययोजनांचा काळ आटोपला. आता जानेवारी ते मार्च या दुसºया टप्प्यातील कालावधीची कामेही अंतिम होणे आवश्यक आहे, तर त्याचवेळी पुढील एप्रिल महिन्यात तीव्र टंचाईचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आतापर्यंत मंजूर आराखड्यातील उपाययोजनांची केवळ २८ टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये असलेल्या एकूण १०८४ उपाययोजनांपैकी १९३ गावांमध्ये १९५ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचवेळी १२६ गावांमध्ये ८५ उपाययोजनांची कामे सुरू असल्याची माहिती आहे. टंचाईग्रस्त गावे, त्यामध्ये करावयाच्या उपाययोजना आणि प्रत्यक्षात पूर्ण झालेली कामे पाहता टंचाई कामांची गती मंदावल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी हाहाकार उडालेला असताना जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, तसेच मंजुरी देणारा महसूल विभाग कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आणली जात आहे. 

उपाययोजना १५ एप्रिलपर्यंत होणार! गावातील तीव्र पाणी टंचाईवर तातडीची उपाययोजना म्हणून १२८ गावांमध्ये विंधन विहिरी आणि कूपनलिकांच्या १४४ कामांना मंजुरी देण्यात आली. १२ मार्चअखेर त्यापैकी १२७ कामे पूर्ण झाली. त्यावर ६७ हातपंप बसविण्यात आले.  त्यातील १५ ठिकाणी वीज पंप आणि आरओ मशीनद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. पाणी पातळी खोल गेल्याने १२ विंधन विहिरी अयशस्वी झाल्या. नव्या आदेशानुसार ६४ गावांमध्ये ४२ विंधन विहिरी, २४ कूपनलिकांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. येत्या १५ एप्रिलपर्यंत कामे पूर्ण होणार आहेत.

टॅग्स :Akola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAkolaअकोला