ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याची मोहोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:11 IST2018-01-02T21:00:22+5:302018-01-02T21:11:59+5:30

अकोला: राजस्थान बांदीकुई येथे झालेल्या ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने विजयाची मोहोर उमटविली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या चमूने डीडीए दिल्ली संघाला ३-0 ने पराभूत करून ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट जिंकली.

Across the All India Football Tournament Akola! | ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याची मोहोर!

ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याची मोहोर!

ठळक मुद्देअंतिम सामन्यात दिल्लीला हरविले ३-0 ने मिळविला विजय

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राजस्थान बांदीकुई येथे झालेल्या ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने विजयाची मोहोर उमटविली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या चमूने डीडीए दिल्ली संघाला ३-0 ने पराभूत करून ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट जिंकली.
बांदीकुई फुटबॉल क्लब यांच्यावतीने आयोजित ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटचा अंतिम सामना शमा युनाइटेड अकोला-महाराष्ट्र व डीडीए दिल्ली या संघामध्ये झाला. सामन्याच्या पूर्वार्धात अकोला टीमच्या प्रिन्सने डोक्याने गोल करून अकोल्याला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मोडून काढण्यासाठी दिल्लीच्या संघाने कडवी झुंज दिली; मात्र अकोल्याच्या कादरने गोल करून अकोल्याचे वर्चस्व कायम ठेवले. सामन्याच्या उत्तरार्धात अकोल्याच्या प्रिन्सने पुन्हा एकदा गोल करून ३-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मोडून काढण्यात दिल्लीच्या संघाला अपयश आल्याने ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने आपली मोहोर उमटविली. 


अकोल्याच्या संघात कॅप्टन मुदस्सीर अली, शोयब खान, शे. फिरोज गवळी, वसीम शेख, नदीम कुरेशी यांच्यासह नागपूरचा शाहरूख खान, अमरावतीचा जावेद खान, पुसदचा अस्लम खान, मुंबईचा प्रिन्स यांचा समावेश होता. अकोला यंग बॉइज महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक शे. गनी यांच्या मार्गदर्शनात व इलयास खान यांच्या संघ व्यवस्थापनात चमूने यश मिळविले. या चमूचे अकोला रेल्वेस्थानकावर सोमवारी मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. या चमूचे फुटबॉल असोशिएशनचे मोहम्मद शे. जावेद अली, अस्लम खान, इलयास खान, गुम्मा चौधरी, दिलीप बिसेन, नकीर खान, सलीम सदर, मोईन खान, मेहबूब खान मो. इरफान आदींनी कौतुक केले. 

Web Title: Across the All India Football Tournament Akola!