ग्राहकांसाठी ‘पावती’ अत्यंत महत्त्वाची

By Admin | Updated: August 28, 2014 01:45 IST2014-08-28T01:23:29+5:302014-08-28T01:45:23+5:30

ग्राहक हक्काबाबतच्या अकोला लोकमत परिचर्चेतील सूर, ग्राहकांनी स्वत: जागरूक असणे गरजेचे.

'Acknowledgment' is very important for customers | ग्राहकांसाठी ‘पावती’ अत्यंत महत्त्वाची

ग्राहकांसाठी ‘पावती’ अत्यंत महत्त्वाची

अकोला : आपण खरेदी केलेली वस्तू व साहित्याची ह्यपावतीह्ण न विसरता घेणे, तसेच ती पावती अधिकृत आहे की नाही, हे तपासणे ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिकावर ग्राहक हक्क कायद्यांतर्गत कारवाईसाठी अधिकृत पावती आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल ग्राहकांमध्ये जागृती नसून, आपले हक्कच माहिती नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपले हक्क जाणून घ्यायला हवे, असा सूर ह्यलोकमतह्णच्या वतीने गुरुवारी दुपारी आयोजित परिचर्चेतून निघाला.
पुणे येथील ग्राहक मंचच्या न्यायालयाने, एखाद्या ग्राहकाने दुकानातून वस्तू विकत घेतल्यावर ती निकृष्ट निघाली तर दुकानदाराने परत घ्यायला हवी, असा निर्णय दिला. त्यामुळे सर्वत्र चर्चेत आलेल्या या विषयावर ह्यलोकमतह्णच्यावतीने बुधवार २७ ऑगस्ट रोजी परिचर्चा घेण्यात आली. परिचर्चेत जिल्हा ग्राहक मंचच्या सदस्य भारती केतकर, ग्राहक पंचायतीचे जिल्हा समन्वयक श्रीराम ठोसर, ग्राहक पंचायतीचे जयप्रकाश पाटील मुरूमकार, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम शिंदे व अँड. नितीन धूत सहभागी झाले होते.

Web Title: 'Acknowledgment' is very important for customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.