युवतीचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:46 IST2019-07-21T12:46:41+5:302019-07-21T12:46:51+5:30
अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका युवतीचा विनयभंग करणाऱ्या कैलास टेकडी येथील आरोपीस अटक करण्यात आली आहे.

युवतीचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत
अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका युवतीचा विनयभंग करणाऱ्या कैलास टेकडी येथील आरोपीस अटक करण्यात आली आहे. या युवकाविरुध्द शनिवारी रात्री सिव्हील लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
कैलास टेकडी परिसरातील रहिवासी हरीष झाडे या युवकाने सिव्हील लांइ्रन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवतीचा विनयभंग केला होता. या युवकाविरुध्द युवतीने शनिवारी सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी युवकाविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.