पलायन केलेला आरोपी गजाआड
By Admin | Updated: May 11, 2015 02:22 IST2015-05-11T02:22:18+5:302015-05-11T02:22:18+5:30
सामूहिक बलात्कारातील आरोपीला शनिवारी रात्री उशिरा अटक.
_ns.jpg)
पलायन केलेला आरोपी गजाआड
तेल्हारा : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या सामूहिक बलात्कारातील आरोपीला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. संजय मुकिंदा बोदळे (जाफ्रापूर) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याने रुग्णालयातून पलायन केले होते. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील कुर्हा काकोडा येथील एक दाम्पत्य तेल्हारा परिसरात मजुरीच्या शोधात आले होते. दाम्पत्याची निवार्याची व्यवस्था न झाल्याने त्यांनी बसस्थानकाचा आश्रय घेतला. ७ फेब्रुवारी २0१५ च्या रात्री तिघांनी महिलेला शेतात नेले होते. या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित महिलेने ८ फेब्रुवारी रोजी तेल्हारा पोलीस ठाण्या धाव घेतली. तिने पोलिसांना ७ फेब्रुवारीला घडलेला घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला प्रारंभ केला. बलात्कारातील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबविली. शोध मोहिमेत पोलिसांनी तेल्हारा येथील अशोक बाबूलाल पिवाल व राजेश खंडेराव यांना अटक केली. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी संजय मुकिंदा बोदळे (जाफ्रापूर) याला अटक करण्यात पोलिसांना शनिवारी यश आले. मात्र, त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले होते.