शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

महिलेस मारहाण करणाऱ्या आरोपीस दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:40 PM

मारहाण केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली.

अकोला: अकोट फैल परिसरातील रहिवासी शेख सत्तार शेख गफ्फार यास महिलेचा विनयभंग करणे तसेच तिला मारहाण केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली. यासोबतच २ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.अकोट फैलातील कादरीपुरा येथील रहिवासी शेख सत्तार शेख गफ्फार हा मजुरी काम करतो. १ फेब्रुवारी २००६ रोजी तो एका घराच्या बांधकामासाठी रेती वरच्या माळ्यावर नेत असताना त्याला सदर घरात महिला एकटीच असल्याचे दिसले. त्यामुळे शेख सत्तार शेख गफ्फार याने महिलेचा घरात घुसून विनयभंग केला; मात्र महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. यामध्ये महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी शेख सत्तार शेख गफ्फार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३२५ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर आरोपीविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. तर ३२५ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय