प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:37+5:302021-04-29T04:14:37+5:30

अकोला : गौरक्षण रोडवर एकमेकांच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक ...

Accused of assault in police custody | प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस पोलीस कोठडी

प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस पोलीस कोठडी

अकोला : गौरक्षण रोडवर एकमेकांच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

गौरक्षण रोडवरील रहिवासी धीरज इंगळे हा युवक रस्त्याने जात असताना त्यांच्या दुचाकीला राजदीप डोसे नामक युवकाच्या दुचाकीचा धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. या वादातच राजदीप डोसे याने त्यांच्याकडे असलेला धारदार शस्त्र धीरज इंगळे यांच्या पोटात खुपसले. त्यामुळे या हल्ल्यात धीरज इंगळे गंभीर जखमी झाले आहे. आरोपी राजदीप डोसे याला काही तासातच अटक करण्यात आली. आरोपीला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा तपास खतांचे ठाणेदार डी. सी. खंडेराव करीत आहे.

Web Title: Accused of assault in police custody