मारहाण प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST2020-12-08T04:16:13+5:302020-12-08T04:16:13+5:30
जुनी वस्ती भागातील मलईपुरा येथे किरकोळ वाद निर्माण होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. २७ नोव्हेंबर रोजी अब्दुल हक अब्दुल ...

मारहाण प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; एकास अटक
जुनी वस्ती भागातील मलईपुरा येथे किरकोळ वाद निर्माण होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. २७ नोव्हेंबर रोजी अब्दुल हक अब्दुल सत्तार ऊर्फ शम्मूभाई यांना काठी व लोखंडी पाइपने मारहाण करून गंभीर जखमी केले. यातील आरोपी जबीउल्ला खान रहेमतुल्ला खान, सोहेल खान अमीउल्ला खान ऊर्फ सोनू, साऊदुल्ला खान अमीउल्ला खान ऊर्फ मोनू, मंसूर अली बरकत अली, हे चार आरोपी अद्यापही फरार असून, यातील शराफत अली बरकत अली याला अटक केली. अटकेनंतर त्याची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. मारहाणीत अब्दुल हक अब्दुल सत्तार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अजूनही नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला ३२४, २९४, १४३ सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. अ. हक अब्दुल सत्तार यांच्या बयानानंतर वरील पाचही आरोपींवर ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल केला.