अकोला जिल्ह्यातून तड़ीपार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 18:24 IST2021-05-18T18:22:50+5:302021-05-18T18:24:31+5:30
Akola Crime News : तड़ीपार आदेशाचे उल्लंघन करून अकोला शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अकोला जिल्ह्यातून तड़ीपार आरोपीला अटक
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाईशेख जुनेर शेख निजाम असे अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव
अकोला : जिल्ह्यातून तड़ीपार केलेल्या अर्थात तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले आहे. शेख जुनेर शेख निजाम असे अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव असून जुने शहरातील हमजा प्लाॅट येथील रहिवासी आहे. अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर आणि पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. तड़ीपार आदेशाचे उल्लंघन करून अकोला शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला धारदार शस्त्रासह शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतून अटक केली आहे.