शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदत वाटपाचा मागितला लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:04 IST

तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.

- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वितरित करण्यात आली; मात्र त्यापैकी किती मदतीची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आणि प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात लेखाजोखा मागत संबंधित माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तअकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त २ लाख १२ हजार शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयार्फत गत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान जिल्ह्यातील संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आतापर्यंत बँकांमध्ये किती रक्कम जमा करण्यात आली आणि बँकांमार्फत किती शेतकºयांच्या खात्यात किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील संबंधित पाच तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी अशी वितरित करण्यात आली मदत!तालुका                  रक्कम (लाखांत)अकोला                    ३६,३७,९२,७४८बार्शीटाकळी             २२,६७,४८,६३८तेल्हारा                    २१,१६,२५,११५बाळापूर                  २८,०१,३७,६६७मूर्तिजापूर               २९,०८,२०,३९४................................................एकूण                      १३७,३१,२४,५६२जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी १३१ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांची मदत वाटप करण्यात आली. वितरित मदतीच्या रकमेपैकी बँकांमध्ये जमा केलेली मदतीची रक्कम आणि बँकांमार्फत आतापर्यंत प्रत्यक्ष किती शेतकºयांच्या खात्यात किती मदतीची रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात तहसीलदारांकडून माहिती मागितली आहे. यासंदर्भात ६ मे रोजी बँक अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार आहे.-जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळFarmerशेतकरी