जिल्हाधिकारी कार्यालसमाेर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:52+5:302021-02-05T06:16:52+5:30
विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध ...

जिल्हाधिकारी कार्यालसमाेर अपघात
विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरवरून पैसे आणण्याच्या मागणीसाठी छळ केल्याची तक्रार पाेलीस ठाण्यात दिली आहे.
चाइल्ड फ्रेंडली पाेलीस स्टेशन
अकाेला : सिव्हिल लाइन्स पाेलीस स्टेशनच्या आवारात चाइल्ड फ्रेंडली पाेलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. मुलांच्या संदर्भातील तक्रारी तसेच मदतीसाठी हे पाेलीस स्टेशन कार्यरत राहणार आहे. विदर्भातील हे पहिले पाेलीस स्टेशन आहे.
धुळीचे साम्राज्य
अकाेला : शहरात निर्मानाधीन रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य आहे. प्रत्येक रस्त्यावर माेठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही शहरातील धूळ कायम आहे.
दुभाजक ठरत आहेत घातक
अकाेला : सिंधी कॅम्प परिसरात राेडवर लावण्यात आलेले लाेखंडी दुभाजक सध्या धाेकादायक ठरत आहेत. या लाेखंडी दुभाजकाची तार बाहेर निघाल्याने वाहनचालकांना त्यापासून धाेका आहे. यावर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.