विद्युत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा कवच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST2021-06-20T04:14:29+5:302021-06-20T04:14:29+5:30

स्थानिक रामेश्वर मंदिर दर्यापूररोड येथे स्वाभिमानी विद्युत वर्कस युनियनमार्फत शिबिर आयोजित करीत ५० कंत्राटी कामगारांना विमा कवच स्टेट ...

Accident insurance cover for electrical contract employees! | विद्युत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा कवच !

विद्युत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा कवच !

स्थानिक रामेश्वर मंदिर दर्यापूररोड येथे स्वाभिमानी विद्युत वर्कस युनियनमार्फत शिबिर आयोजित करीत ५० कंत्राटी कामगारांना विमा कवच

स्टेट बँक ऑफ इंडियाचे माध्यमातून दिले.

अपघाती विमाबाबत स्टेट बँकेचे कर्मचारी रोहित आबुलकर, गजानन तायडे

यांनी कोरोनाच्या संकटकाळात सेवा देणारे कर्मचाऱ्यांना शासनाचे विमासुरक्षा कवचबाबत माहिती दिली. यावेळी संघटनेचे किरण पवार, योगेश वाकोडे यांनी स्वाभिमानी युनियन विद्युत वर्कस युनियन नेहमी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन योगेश वाकोडे यांनी, तर आभार प्रशांत मोहोकार यांनी मानले. यावेळी कंत्राटी कर्मचारी

मोहन हिरपूरकर, गोपाल केदार, अक्षय उकळकार, मंगेश थोरात, अभिजित ठाकरे, निरुत्ती बायस्कार, संगम तेलगोटे, सागर शेंगोकार, पांडुरंग पद्मने, उमेश नाहाटे आदी उपास्थित होते.

Web Title: Accident insurance cover for electrical contract employees!