धारगड मार्गावर अपघात; आकोट येथील युवक ठार
By Admin | Updated: March 9, 2016 02:22 IST2016-03-09T02:22:35+5:302016-03-09T02:22:35+5:30
आकोट-हरिसाल मार्गावरील वळणावर दुचाकीचा अपघात.

धारगड मार्गावर अपघात; आकोट येथील युवक ठार
आकोट: सातपुड्यातून जाणार्या आकोट-हरिसाल मार्गावरील वळणावर दुचाकीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत गोपाल नथ्थूजी रेखाते (३८) यांचा मृत्यू झाला असून, ते आकोट येथील भगतवाडी परिसरातील रहिवासी होते. .
महाशिवरात्रीनिमित्त धारगड मार्गावर भंडार्याचे आयोजन केले होते. येथून जेवण आटोपून बुधे यांच्या दुचाकीवर गोपाल रेखाते हे दोघे जण परत येत होते. मार्गातील दग्र्याजवळ असलेल्या पुलावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये गोपाल रेखाते याचा मृत्यू झाला. बुधे हे जखमी झाले. गोपाल रेखाते याच्या पश्चात आई, पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे.