आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:27+5:302021-06-17T04:14:27+5:30

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष नयना मनतकार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा ...

Accept the demands of Asha Sevik immediately | आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा

आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष नयना मनतकार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण पाठिंबा आहे. कोरोनाकाळात आशा सेविकांनी गेले दीड वर्ष काम केले आहे. अजूनही करत आहेत. आरोग्य सुरक्षा नसताना, विमा कवच नसताना, योग्य मानधन मिळत नसतानाही आशा सेविका काम करीत आहेत.

मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अनेक आशा सेविकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे कोरोनामुळे मृत्यू झाले. नियमानुसार ४ तास काम करणे अपेक्षित असताना १२ तास काम करावे लागते आहे. मात्र, या कामाची राज्य सरकारला किंमत नाही.

कोरोना रुग्णांच्या सर्वेक्षणाबरोबर लसीकरण मोहिमेतही राज्य सरकारने आशा सेविकांचा समावेश केला. मात्र, अजून या कामाचा पुरेसा मोबदला दिलेला नाही. आता तरी राज्य सरकारने आशा सेविकांच्या मागण्यांची पूर्तता करावी, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Accept the demands of Asha Sevik immediately