शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना देणार जलदगतीने शिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:02 IST

अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना जलदगतीने शिक्षण देऊन इयत्ता दहावीची तयारी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून एएलपी कार्यक्रम २0१८-१९ (अ‍ॅक्सलरेटेड लर्निंग प्रोग्राम) सुरू करण्यात आला.

- नितीन गव्हाळे

अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना जलदगतीने शिक्षण देऊन इयत्ता दहावीची तयारी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून एएलपी कार्यक्रम २0१८-१९ (अ‍ॅक्सलरेटेड लर्निंग प्रोग्राम) सुरू करण्यात आला. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून १५ शाळांचा एक गट तयार करून त्यापैकी एका शाळेची संपर्क शाळा म्हणून निवडसुद्धा करण्यात आली आहे.जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेच्या पुढाकारातून नववीतील विद्यार्थ्यांसाठी एएलपी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक शाळेतून विद्यार्थी माध्यमिक शाळेत इयत्ता नववीत येतो. तेव्हा परीक्षा पद्धती, काठिण्य पातळीत बदल होता. आठवीतून नववीत गेल्यावर विद्यार्थी कच्चे असतात. त्यांना शिकविताना अनेकदा समजत नाही. यातून मुलांची अनुपस्थिती वाढते आणि अनुपस्थितीमुळे शिक्षण घेताना अडचणी येतात. नववीत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. यावर उपाययोजना म्हणून एएलपी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नववीत पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले, आठवीतून नववीत जाताना क व ड श्रेणी प्राप्त विद्यार्थी एएलपी लाभार्थी असतील. १५ शाळांचा संपर्क गट तयार करून आॅगस्ट महिन्यापासून या गटांचे महिन्यातून एका संपर्क सत्र घेण्यात येईल. त्यापैकी संपर्क शाळेमध्ये दर महिन्यातून एका शनिवारी शाळेत एएलपी संदर्भात करत असलेले प्रयोग, तयार केलेली शैक्षणिक साधने, शैक्षणिक व्हिडिओंचे आदान-प्रदान १५ शाळांमध्ये होईल.एएलपीचा उद्देशसाडेचार वर्षातील शिक्षणाची तूट भरून काढून नववी शिकण्याच्या पातळीपर्यंत मुलांना आणणे, प्रामाणिकपणे नववी उत्तीर्ण होणे, मूल स्वत: शिकणे, गुणवत्ता विकास करणे, आत्मविश्वास निर्माण करणे, आनंददायी शिक्षण देऊन विद्यार्थी उपस्थिती वाढविणे आदी जलद गती शिक्षणाचे उद्देश आहेत. त्यासाठी १५ दिवस कच्च्या संबोधांचे कृतिशील-रचनावादी अध्यापन, ३0 दिवस विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन, १५ दिवस समजलेल्या संबोधांचे दृढीकरण व राहिलेले संबोधन पूर्ण करणे असे एएलपीच्या उपक्रमाच्या वेळेची विभागणी करण्यात आली आहे. 

नववीमध्ये क व ड श्रेणीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी विषयाची तयारी कृतिशील व रचनावादी अध्यापनातून तयारी करून घेत, त्यांना दहावी परीक्षेसाठी तयार करण्यासाठी एएलपी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.- जितेंद्र काठोळे, समन्वयकएएलपी कार्यक्रम

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी