साडेपाच लाखांच्या चाेरी प्रकरणात फरार असलेल्या आराेपीस अटक
By सचिन राऊत | Updated: May 24, 2024 21:56 IST2024-05-24T21:56:22+5:302024-05-24T21:56:42+5:30
अकाेला :सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील आरकेजी एंटरप्रायजेसच्या गाेदामावर गाेडाउन कीपर असलेल्या आराेपीने दाेन वर्षांपुर्वी ५ लाख ५० हजार ...

साडेपाच लाखांच्या चाेरी प्रकरणात फरार असलेल्या आराेपीस अटक
अकाेला :सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील आरकेजी एंटरप्रायजेसच्या गाेदामावर गाेडाउन कीपर असलेल्या आराेपीने दाेन वर्षांपुर्वी ५ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य चाेरी केले हाेतेे. या आराेपीस शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
आरकेजी एंटरप्रायजेस कंपनीचे मालक आलोककुमार रतणलाल गोयनका यांच्या तक्रारीनुसार २५ मे २०२२ राेजी त्यांच्या कंपनीतील गोडावुन किपर जयकुमार सुमंतराव देशमुख रा. अकोला याने गोडावुण मधील पिवीसी कंडयुट पाईप ७४ बंडल किमंत ५ लाख ५० हजार चोरून अफरातफर केली. यावरुन सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात आरोपीविरूध्द ४०८ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
या गुन्हयातील आरोपी जयकुमार सुमंतराव देशमुख ३३ वर्ष रा नेहरू नगर मोठी उमरी हा फरार झाला होता. तो कर्नाटकातील बंगलोर येथे असल्याच्या माहीतीवरुन पाेलिसांनी त्यास अटक केली. ही कारवाइ ठाणेदार सुनिल वायदंडे यांचे मार्गदर्शखाली बि.सि.रेधीवाले, आतीष बावीस्कर, साहेबराव नवलकार व गुन्हे शोध पथकाचे महेंद्र बहादुरकर, निलेश बुंदे, अमोल दाजु, शैलेश घुगे, अश्विन सिरसाट, शेख ख्वाजा, किशोर येउल यांनी केली.