आकोटात दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण
By Admin | Updated: December 18, 2014 01:00 IST2014-12-18T01:00:35+5:302014-12-18T01:00:35+5:30
पाच दिवसांनंतर गुन्हा दाखल.

आकोटात दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण
आकोट: शहरातील मदशामध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याची घटना १३ डिसेंबर रोजी घडली. हीबाब बुधवारी उजेडात आल्याने आकोट शहर पोलीस ठाण्यात पाच दिवसांनंतर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आकोट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीद अब्दुल लतिफ (११) व त्याचा मित्र हिफजू रहेमान शेख हुसेन (१३) हे दोघेही मजिदिया प्लॉटमधून १३ डिसेंबर रोजी मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असल्याचे सांगून निघून गेले. दुपारी २ वाजता निघालेले दोघेही मदरशामध्ये पोहोचलेच नाही. त्यामुळे त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. शनिवारपासून शोध घेऊनही ही दोन्ही मुलं कुठेच आढळून आली नाही. त्यामुळे या मुलांना पळवून नेले असल्याचा संशय पालकांनी व्यक्त करून अज्ञान व्यक्तीविरुद्ध मुलांना पळवून नेल्याची तक्रार अब्दुल जाहीदचे वडील आ. लतिफ अ. कदिर (रा. दर्यापूर) यांनी बुधवारी आकोट शहर पोलीस ठाण्यात केली. त्यांनी मुलांना पळवून नेल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून आकोट शहर पोलिसांनी अज्ञान आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३६३ अन्वये गुन्हा केला आहे.