हिवरखेड येथून अपहरण; पंढरपूर पोलिसांनी केली व्यावसायिकाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:21 IST2021-02-24T04:21:09+5:302021-02-24T04:21:09+5:30

अकाेला/पंढरपूर : जिल्ह्यातील हिवरखेड येथून एका ५४ वर्षीय व्यावसायिकाचे सहा लाख रुपये खंडणीसाठी अपहरण झाले होते. अपहरण झालेल्या सुरेश ...

Abduction from Hivarkhed; Pandharpur police release businessman | हिवरखेड येथून अपहरण; पंढरपूर पोलिसांनी केली व्यावसायिकाची सुटका

हिवरखेड येथून अपहरण; पंढरपूर पोलिसांनी केली व्यावसायिकाची सुटका

अकाेला/पंढरपूर : जिल्ह्यातील हिवरखेड येथून एका ५४ वर्षीय व्यावसायिकाचे सहा लाख रुपये खंडणीसाठी अपहरण झाले होते. अपहरण झालेल्या सुरेश कृष्णाप्पा मोदे या व्यावसायिकाची सुटका करून एकास ताब्यात घेण्याची कारवाई पंढरपूर पोलिसांनी केली आहे.

सुरेश कृष्णाप्पा मोदे यांचे आठ दिवसांपुर्वी एक चारचाकी गाडीसहीत अपहरण केले होते. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात राजाभाऊ इंगळे (वय ५५ रा छोटेवाडी ता. माजलगाव, जिल्हा बीड) याच्या व त्याच्या साथदारांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी अपहरण केलेल्या व्यक्तींना घेऊन बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात घेऊन फिरत आहेत. ही माहिती पंढरपूर पोलीसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी तीन पथके तयार केली. या पथकामध्ये सपोनि राजेंद्र मगदुम, सपोनि मिठु जगदाळे, पोउपनि प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी पाटील, पोना पवार यांचा सहभाग होता.

या पथकानी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचला व राजाभाऊ इंगळे याला अपहरण केलेल्या व्यक्तीस गाडीसह ताब्यात घेतले. सुरेश कृष्णाप्पा मोदे यांची सुटका करण्यात आली आहे.

आणखी लोकांचा शोध सुरू

सुरेश कृष्णाप्पा मोदे या व्यापाऱ्यांचे अपहरण झाले होते. त्यांची सुटका केली आहे. तर या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या राजाभाऊ इंगळेला हिवरखेड पोलीस ठाण्याचे पोउपनि विठ्ठल वाणी यांचेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. या अपहरण प्रकरणात आणखी किती लोक आहेत, याचा शोध घेण्याचे काम सुरू राहणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांनी सांगितले.

Web Title: Abduction from Hivarkhed; Pandharpur police release businessman