Akola: अबब... ट्रकमधून गांजाची तस्करी; सुमारे १४१ किलो गांजा हस्तगत गुन्हा दाखल, ट्रक जप्त
By सचिन राऊत | Updated: March 20, 2024 20:55 IST2024-03-20T20:54:03+5:302024-03-20T20:55:44+5:30
Akola News: ट्रकमधून गांजाची तस्करी करताना माना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले. ही कारवाई १९ मार्च रोजी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील माना फाटा येथे केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola: अबब... ट्रकमधून गांजाची तस्करी; सुमारे १४१ किलो गांजा हस्तगत गुन्हा दाखल, ट्रक जप्त
- सचिन राऊत
अकोला - ट्रकमधून गांजाची तस्करी करताना माना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले. ही कारवाई १९ मार्च रोजी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील माना फाटा येथे केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माना पोलिस बुधवारी रात्री गस्तीवर असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून एक ट्रक गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी माना फाटा येथे ट्रक थांबविला. त्याची चौकशी केली असता ट्रकमध्ये १४१ किलो ३३० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी आरोपी पिंटू कृष्णदास (३५, परगना, पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले. या कारवाईत २८ लाख २६ हजार ६०० रुपयांचा गांजा व एक मोबाइल किंमत ४० हजार रुपये, दहाचाकी ट्रक किंमत २५ लाख रुपये असा एकूण ५३ लाख ६६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावरून माना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन करीत आहेत.