अकोल्यात आम आदमी पक्षाने केली चिनी उत्पादनांची जाहीर होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 18:15 IST2020-06-17T18:15:14+5:302020-06-17T18:15:22+5:30
शहिदांना अकोल्यात आम आदमी पक्षाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करून चिनी उत्पादनांची जाहीर होळी करण्यात आली.

अकोल्यात आम आदमी पक्षाने केली चिनी उत्पादनांची जाहीर होळी
अकोला : भारत-चीन दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना अकोल्यात आम आदमी पक्षाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करून चिनी उत्पादनांची जाहीर होळी करण्यात आली. यावेळी चीन सरकारच्या धोरणाचा निषेधही व्यक्त केला आहे.
भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या २० सैनिकांना तसेच कमांडो संतोष कुमारसह सैनिकांना आम आदमी पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे संदीप जोशी यांनी भारतीय सैनिकांच्या युद्ध कौशल्यामुळे झिरो पॉईंट आॅक्सिजन असताना अशा दुर्गम जागी चीन सैनिकाला त्यांची जागा दाखवून दिली, अशा सर्व सैनिकांचा देशाला अभिमान असल्याचे नमूद केले. श्रद्धांजलीनंतर चिनी उत्पादीत विविध वस्तूंची होळी करून चीनबाबत आपला रोष व्यक्त केला. यावेळी शेख अन्सार, संदीप जोशी, ठाकूरदास चौधरी, रवींद्र सावळेकर, सुहास जैन,दिलीप पाटील,गजानन गणवीर,शैलेश सावरकर,अरविंद कांबळे, प्रा. दाभाडे, काझी लायक अली,मुजीबुर रहमान सह शहरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.