मालवण येथे समुद्रात बोट बुडाल्याने अकोल्यातील युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 18:25 IST2022-05-24T18:25:29+5:302022-05-24T18:25:34+5:30
A youth drowned in a sea at Manvan : आकाश देशमुख हा आमदार नितीन देशमुख यांचा भाचा आहे.

मालवण येथे समुद्रात बोट बुडाल्याने अकोल्यातील युवकाचा मृत्यू
अकोला : मालवण येथील तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेली बोट अचानक उलटली. बाेटमधील २० जण समुद्रात पाण्यात बुडाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये अकोल्यातील शास्त्री नगरात राहणारा आकाश देशमुख (३०) यांचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी एक बोट घेऊन गेली होती. बोटमध्ये मुंबई, पुण्याचे सर्वाधिक पर्यटक होते. अकोल्यातील आकाश देशमुख हासुद्धा पर्यटनासाठी मालवण येथे गेला होता. बोट समुद्रात गेल्यावर अचानक उलटली. यात पाण्यात बुडून दोघांचा करुण अंत झाला. आकाश देशमुख हा आमदार नितीन देशमुख यांचा भाचा आहे. आकाश एकुलता एक मुलगा असल्याने, त्यांच्या निधनामुळे देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बोटीतील २० जणांपैकी १८ जणांना वाचविण्यात यश मिळाले.