लग्नाचे आमिष अन् शाेषण, आता दिला नकार; रामदास पेठ पाेलिसात गुन्हा दाखल

By आशीष गावंडे | Updated: April 3, 2024 21:34 IST2024-04-03T21:34:16+5:302024-04-03T21:34:28+5:30

युवकाविराेधात रामदास पेठ पाेलिस ठाण्यात शारिरिक शाेषण व फसवणूक केल्याची तक्रार नाेंदवली.

A young woman complained of physical abuse of a youth in Akola | लग्नाचे आमिष अन् शाेषण, आता दिला नकार; रामदास पेठ पाेलिसात गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष अन् शाेषण, आता दिला नकार; रामदास पेठ पाेलिसात गुन्हा दाखल

अकाेला: तीन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात हाेते. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका घेत शारीरिक जवळीक साधली. अन् नंतर लग्न करण्याची वेळ आली तेव्हा प्रियकर टाळाटाळ करीत असल्याचे पाहून अखेर दिल्ली येथील युवतीने थेट अकाेला गाठले. रामदासपेठ पाेलिस ठाण्यात प्रियकराविराेधात लैंगिक शाेषण व फसवणूकीची तक्रार दिली असता, बुधवारी पाेलिसांनी कलम ३७६ नुसार माेहसीन सुरया नामक व्यक्तीविराेधात गुन्हा दाखल केला. 

रामदासपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील निता गेस्ट हाउुस परिसरातील माेहसीन सुरया (वय ३५) हा युवक दिल्ली येथील एका ३२ वर्षीय युवतीच्या संपर्कात आला. मागील तीन वर्षांपासून त्यांची एकमेकांसाेबत ओळख असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. यादरम्यानच्या कालावधीत सदर युवक व युवतीमध्ये प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाका घेत दाेघांनी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतराने युवतीने लग्नासाठी तगादा लावला असता, युवकाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

ही बाब युवतीच्या ध्यानात आल्यानंतर तीने २ एप्रिल राेजी अकाेला गाठले. तसेच याप्रकरणी युवकाविराेधात रामदास पेठ पाेलिस ठाण्यात शारिरिक शाेषण व फसवणूक केल्याची तक्रार नाेंदवली. पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांनी प्रकरणाची शहानिशा केली असता व वैद्यकीय अहवालाच्या आधारे  आराेपी युवकाविराेधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदर युवक फरार झाला असून पुढील तपास पाेलिस निरीक्षक बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Web Title: A young woman complained of physical abuse of a youth in Akola