वृद्धाकडील ४० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चाेरटयांनी केली लंपास; अकोल्यातील घटना

By सचिन राऊत | Published: July 10, 2024 11:59 PM2024-07-10T23:59:22+5:302024-07-10T23:59:56+5:30

सिटी काेतवाली पाेलिसांकडे तक्रार, चाैकशी सुरु

A bag containing 40 thousand rupees belonging to an elderly woman was looted by unknown thieves; Incident in Akola | वृद्धाकडील ४० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चाेरटयांनी केली लंपास; अकोल्यातील घटना

वृद्धाकडील ४० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चाेरटयांनी केली लंपास; अकोल्यातील घटना

सचिन राऊत, अकोला: सिटी कोतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भाजी बाजारातून जात असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाकडील ४० हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चाेरटयांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पाेलिसांनी चाैकशी सुरु केली आहे.

एक ६५ वर्षीय वृध्दाने नातवांच्या शाळेच्या शुल्कासह कापड व पुस्तके घेण्यासाठी ४० हजार रुपयांची रक्कम काढली हाेती. त्यानंतर ही रक्कम घेउन जात असतांना भाजी बाजार परिसरात अज्ञात चाेरटयांनी त्यांच्यावर पाळत ठेउन त्यांच्याकडील बॅग पळवीली. वृध्द भाजी घेत असतांनाच त्याच्याकडील बॅग पळविल्याचे त्यांनी सिटी काेतवाली पाेलिसांना सांगीतले. सिटी काेतवाली पाेलिसांनी या प्रकरणाची चाैकशी सुरु केली असून चाेरटयास अटक करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगीतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चाेरटयांचा शाेध घेण्यात येत आहे.

Web Title: A bag containing 40 thousand rupees belonging to an elderly woman was looted by unknown thieves; Incident in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.