शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

८४ खेडी योजना दुरुस्तीचे साहित्य गायब; मजीप्राने गिळले मूग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 3:52 PM

अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी देण्यासाठी १० कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली. दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेले साहित्य गायब झाल्याने ७७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा अपहार झाला.

अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी देण्यासाठी १० कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली. दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेले साहित्य गायब झाल्याने ७७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा अपहार झाला. तरीही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. ही बाब आता योजना हस्तांतरण करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसह संबंधितांच्या गळ्यात पडणार आहे. विशेष म्हणजे, गत वर्षभरापासून या अपहाराबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मूग गिळून असल्याने त्यांचाही या प्रकरणाशी असलेला संबंध तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी करून पुरवठा केलेल्या पाइपपैकी ४६६५ मीटर (४.६ किमी) पाइपची योजनेतील गावांसाठी जोडणीच झालेली नाही. त्याचवेळी खरेदी केलेले हे पाइप कुठे आहेत, याची माहितीही प्राधिकरणाकडे नाही. या पाइपची किंमत ३२ लाखांपेक्षाही अधिक आहे. एअर शॉफ्टसाठी १०० एमएसटीची खरेदी केली. त्यापैकी ७२ वापरल्या गेल्या. २८ एमएसटी गायब करण्यात आल्या आहेत. त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. एअर व्हॉल्व्ह १५० पैकी ७२ चा वापर झाला. ७८ व्हॉल्व्हचा हिशेब नाही. संतुलन टाकीस अतिरिक्त आउटलेट लावण्यासाठी ३३६ ठिकाणी काम केल्याचे सांगितले; मात्र ते कुठे झाले, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. चेंबरचे बांधकाम केल्याची नोंद नाही, तरीही १ लाख १९ हजारांचे देयक काढण्यात आले. २५ सीआयडीएफ स्युल्स व्हॉल्व्हपैकी सात ठिकाणी बसविण्यात आले. १८ व्हॉल्व्ह रिप्लेस केले. ते व्हॉल्व्हही गायब आहेत. गळती दुरुस्ती करण्यासाठी एलआरसी पुरवठा करण्यात आला. मोजमाप पुस्तिकेत दुरुस्तीची नोंद असली, तरी त्या नेमक्या कुठे वापरण्यात आल्या, ही बाबही उघड झालेली नाही. डीआय स्पेशल १५४०० किलोग्रॅम खरेदी झाली. त्यापैकी १२६६७ किलोचा वापर झाला. उर्वरित २७३३ किग्रॅ कुठे आहेत, ही बाब कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधितांकडूनच घ्यावी लागणार आहे. सीआयडी जॉइंटसाठी १३ लाख २८ हजार रुपये तर ६८७ ठिकाणी गळती दुरुस्तीसाठी ८ लाख ९६ हजार रुपये काढण्यात आले. ही कामे एकाच दिवशी केल्याची माहिती आहे. साहित्य पुरवठ्याची साठा पुस्तकात नोंद नाही, तसेच कामे कोणत्या ठिकाणी केली, याचीही माहिती उपलब्ध नसल्याने ८४ खेडी योजनेची दुरुस्ती केली की निधी उकळण्यासाठी कामे झाली, हा मोठा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला