शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

कापशी, शिवर तलावातून ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:31 PM

कापशी आणि शिवर तलावातून आतापर्यंत ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला.

ठळक मुद्देकापशी तलावातील पाच जेसीबीने ११०२ तास काम केले असून, ५८५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.शिवर तलावातून दोन जेसीबीद्वारे २५१३० घनमीटर गाळ काढण्यात आला असून, मशीन ७१८ तास चालल्या आहेत. या दोन तलावांमध्ये आठ कोटी लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे.

अकोला: भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम्-सुफलाम् प्रकल्पांतर्गत कापशी आणि शिवर तलावातून आतापर्यंत ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून, या दोन तलावांमध्ये आठ कोटी लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे, अशी माहिती सुजलाम्-सुफलाम् प्रकल्पाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुभाष गादिया यांनी दिली आहे.कापशी तलावात २७ एप्रिलपासून ५ जेसीबी मशीन आणि शिवर तलावात ६ फेब्रुवारीपासून दोन जेसीबी मशीन सुरू असून, या मशीनसाठी राज्य सरकार डीझल उपलब्ध करून देत आहे.कापशी तलावातील पाच जेसीबीने ११०२ तास काम केले असून, ५८५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ ८० शेतकऱ्यांनी आपल्या १८० एकर शेतात टाकला असून, यासाठी ट्रॅक्टरच्या १५५८५ फेºया झाल्या आहेत. गाळ काढल्यामुळे कापशी तलावात ५ कोटी ५० लाख लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमतेची वाढ झाली आहे.शिवर तलावातून दोन जेसीबीद्वारे २५१३० घनमीटर गाळ काढण्यात आला असून, मशीन ७१८ तास चालल्या आहेत. गाळ काढल्यामुळे या तलावात २ कोटी ५० लाख लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे.महापौर विजय अग्रवाल, आयुक्त संजय कापडणीस, उपविभागीय अधिकारी अपार, कार्यकारी अभियंता ताठे, नगरसेवक अनिल मुरूमकार, सुनीता अग्रवाल व सुजाता अहिर यांच्या पुढाकाराने कापशी आणि शिवर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रा. सुभाष गादिया, सुजलाम्-सुफलाम् प्रकल्प जिल्हा व्यवस्थापक नितीन राजवैद्य, पर्यवेक्षक श्रीकांत पोफळकर, राहुल सपकाळ, तालुका समन्वयक संतोष सिरसाट, नजिया खान, कापशीचे सरपंच अंबादास उमाळे, अकोला महानगरपालिका कर्मचारी व वाहन चालक यांनी परिश्रम घेतले.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नोडल अधिकारी मनोज लोणारकर, जिल्हा समिती सचिव व जिल्हा जलसंधारण अधिकारी श्यामकांत बोकये यांच्या नेतृत्वाखाली सुजलाम्-सुफलाम् अकोला प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी