शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

८ हजार ५८६ विद्यार्थ्यांना मिळाला ‘मोबाइल शिक्षकां’चा आधार

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST

अपंग, गतिमंद विद्यार्थ्यांना मिळताहेत शिक्षणाचे धडे.

अकोला : सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच अपंग व गतिमंद विद्यार्थ्यांनादेखील सर्वांगीण शिक्षण मिळावे म्हणून शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत ह्यमोबाइल शिक्षकाह्णची संकल्पना मांडली होती. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून ह्यमोबाइल शिक्षकांह्णची सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५0 मोबाइल शिक्षक कार्यरत असून, जिल्ह्यातील ८ हजार ५८६ अपंग, गतिमंद विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे त्यांच्याकडून मिळाले आहेत. अंध, मूकबधिर तसेच गतिमंद मुले नेहमीच शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहतात. त्यांना सर्वसाधारण शिक्षणासोबतच शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी विशेष शिक्षणाची आवश्यकता असते; परंतु अनेकदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार केल्यास या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नेहमीच डावलण्यात येत असल्याचे दिसून येते. या विद्यार्थ्यांनादेखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांंसोबत स्पर्धेत उभे राहता यावे म्हणून शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी ह्यमोबाइल शिक्षकह्ण ही नवी संकल्पना मागील काही वर्षांंपूर्वी मांडली होती. या संकल्पनेनुसार जिल्हा परिषद शाळांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गटसाधन केंद्रांतर्गत तीन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांवर विशेष तज्ज्ञ शिक्षकांची सेवा सुरू झाल्याने अंध, मूकबधिर आणि गतिमंद विद्यार्थ्यांंना आधार मिळाला व त्यांनादेखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांंच्या बरोबरीने शिक्षणाचा हक्क खर्‍या अर्थाने मिळायला सुरुवात झाली. जिल्ह्यात अशा विद्यार्थ्यांंना विशेष शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ५0 ह्यमोबाइल शिक्षकांह्णची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मोबाईल शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील अपंग व गतिमंद मुलांसाठी मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. या शिक्षकांच्या मदतीने अंध, मूकबधिर व गतिमंद विद्यार्थीदेखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण घेत आहेत.