पिस्तुलच्या धाकावर लुटले ८ लाखाचे सोने !

By Admin | Updated: July 14, 2015 02:02 IST2015-07-14T02:02:17+5:302015-07-14T02:02:17+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटना

8 lakhs of gold looted by a pistol! | पिस्तुलच्या धाकावर लुटले ८ लाखाचे सोने !

पिस्तुलच्या धाकावर लुटले ८ लाखाचे सोने !

नांदुरा (जि. बुलडाणा): नांदुरा येथील सोने-चांदीच्या व्यापार्‍याकडून ८ लाख किंमतीचे सोने व चांदीचे दागिण्याची थैली पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता नांदुरा-पिंपळगाव राजा रस्त्यावर घडली. नांदुरा येथील सोने -चांदीचे व्यापारी किशोर नारायण वर्मा नेहमीप्रमाणे सायंकाळी पिंपळगाव राजा येथील आपले ज्वेलर्सचे दुकान बंद करुन नांदुरा येथे मोटारसायकलने वसाडी मार्गे घरी येत होते. दरम्यान वडगांव फाट्याजवळ त्यांचा पाच जणांनी पाठलाग करून व्यापार्‍यास पिस्तुलाचा धाक दाखवुन त्यांच्याजवळील ८ लाख रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागीने घेवून मोताळ्याकडे पसार झाले. या पाचही दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता तसेच त्यांच्याकडे विनानंबरची मोटारसायकल होती. नांदुरा पोलीसांनी नाकाबंदी केली.

Web Title: 8 lakhs of gold looted by a pistol!