अकोला जिल्हय़ात ७८७ घरांची पडझड

By Admin | Updated: July 29, 2014 20:30 IST2014-07-29T20:30:11+5:302014-07-29T20:30:11+5:30

पावसाचा तडाखा; ५९ लाखांचे नुकसान

787 houses collapse in Akola district | अकोला जिल्हय़ात ७८७ घरांची पडझड

अकोला जिल्हय़ात ७८७ घरांची पडझड

अकोला: गेल्या दोन दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे जिल्हय़ात ७८७ घरांची पडझड झाली असून, ५९ लाख ५0 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे.
गेल्या मंगळवार व बुधवारी जिल्हय़ात संततधार पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तसेच वादळी वारी आणि पावसाचा जिल्हय़ात ७८७ घरांना तडाखा बसला. १३ घरांची पूर्णत: तर ७७४ घरे आणि गोठय़ांची अंशत: अशी एकूण ७८७ घरांची पडझड झाली. त्यामध्ये अकोला १३९,आकोट १२८ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ५२0 घरांच्या नुकसानीचा समावेश आहे. या सर्व घरांचे ५९ लाख ५0 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी वर्तविण्यात आला आहे.
याशिवाय संततधार पाऊस आणि पुरामुळे अकोला तालुक्यात ५९५ कोंबड्या, आकोट तालुक्यात २ म्हशींचा मृत्यू झाला आहे. लहान-मोठय़ा जनावरांच्या मृत्यूमुळे जिल्हय़ात एकूण २ लाख ८७ हजारांचे नुकसान झाल्याचेही प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: 787 houses collapse in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.