महान धरणात ७१.६८% जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:55 AM2020-07-26T10:55:24+5:302020-07-26T10:55:31+5:30

. दमदार पाऊस होत असल्याने, धरणातील जलसाठा ७१.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

71.68% water storage in Mahan Dam | महान धरणात ७१.६८% जलसाठा

महान धरणात ७१.६८% जलसाठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
महान : अकोला शहरासह मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू व खांबोरा ग्रामीण पुरवठ्यावरील एकूण ६४ खेडेगावांची तहान भागविणाऱ्या महान धरणाच्या जलसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. दमदार पाऊस होत असल्याने, धरणातील जलसाठा ७१.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेत दोन दिवसांपासून महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसमुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. २५ जुलै रोजी सकाळी महान धरणात ११३५.२० फूट, ३४६.०१ मीटर, ६१.९० दलघमी व ७१.६८ टक्के एवढा जलसाठा झाला होता. गतवर्षी २५ जुलै २०१९ रोजी धरणात केवळ ३.१५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत महान धरणात शनिवार रोजी ६९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १ जून ते २५ जुलैपर्यंत एकूण ३२६ मि.मी. पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागात करण्यात आली आहे. महान धरणाच्या प्रत्येक गेटची साइज १६ बाय ४० फूट असून, या मुख्य गेटवर १० फूट पाणी आले आहे. धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ६ फूट पाण्याची आवश्यकता आहे.
धरणाच्या वाढत्या जलसाठ्याकडे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, बोरगाव मंजूचे उपविभागीय अधिकारी अभिजित नितनवरे, महान शाखेचे शाखा प्रबंधक नीलेश धारे, एस. व्ही. जनोरकर, शंकर खरात, पिंपळकर, पाठक, हातोलकर, आगे, झळके हे लक्ष ठेवून आहेत. 

अकोलेकर, शेतकऱ्यांची चिंता मिटली!
धरणाची पाणी पातळी ७० ते ८० टक्क्यांवर पोहोचल्यावर पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. सध्या पातळी ७२ टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकर नागरिकांसह शेतकºयांची चिंता मिटली आहे. महान धरण ते उन्नई बंधाºयापर्यंत नदीकाठावरील शेतकºयांना दरवर्षी रब्बी हंगामाकरिता धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा!
पाणी पातळी आराखड्यानुसार ३१ जुलैपर्यंत धरणात ८० टक्क्यांपर्यंत जलसाठा पोहोचल्यास शिल्लक पाणी धरणातून नदीपात्रात सोडावे लागते. धरणात सध्या ७२ टक्के जलसाठा असून, यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचे गेट उघडण्याची शक्यता असल्याने महान पाटबंधारे विभागाकडून नदीकाठावरील ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: 71.68% water storage in Mahan Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.