११ ग्रामसेवक पदांसाठी ७१३ उमेदवारांनी दिली परीक्षा
By Admin | Updated: November 10, 2014 01:21 IST2014-11-10T01:21:45+5:302014-11-10T01:21:45+5:30
अकोला जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया, ३४४ उमेदवार गैरहजर.

११ ग्रामसेवक पदांसाठी ७१३ उमेदवारांनी दिली परीक्षा
अकोला: जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेत ११ कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी रविवार, ९ नोव्हेंबर रोजी अकोल्यातील पाच केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. या पदांसाठी ७१३ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, ३४४ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचार्यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामध्ये ११ कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी रविवारी सकाळी १0 ते ११.३0 या वेळत लेखी परीक्षा घेण्यात आली. अकोल्यातील सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या विद्यालय, शिवाजी महाविद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू ईरा हायस्कूल व जागृती विद्यालय या पाच केंद्रांवर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण १ हजार ५७ उमेदवारांपैकी पाचही केंद्रांवर ७१३ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, उर्वरित ३४४ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. पेपर तपासणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उमेदवारांची गुणानुक्रमे यादी जाहीर करण्यात येणार आहे.