महिनाभरात ७ जणांनी केले मरणोत्तर नेत्रदान

By Admin | Updated: October 30, 2015 01:30 IST2015-10-30T01:30:50+5:302015-10-30T01:30:50+5:30

ऑक्टोबर महिन्यात सात नेत्रदात्यांनी मरणोत्तर नेत्रदान; १४ दृष्टिहिनांना दृष्टिलाभ.

7 people have died in the past. Eye donation | महिनाभरात ७ जणांनी केले मरणोत्तर नेत्रदान

महिनाभरात ७ जणांनी केले मरणोत्तर नेत्रदान

अकोला : अकोला नेत्रदान व नेत्ररोपण संशोधन केंद्र तसेच नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटल नेत्रपेढीच्यावतीने ऑक्टोबर महिन्यात सात नेत्रदात्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. त्यांच्या या नेत्रदानामुळे १४ दृष्टिहिनांना दृष्टिलाभ मिळाला आहे. नेत्रदात्यांमध्ये सिंधीकॅम्प येथील रहिवासी पारूमल मंघाणी, सतराज मोटवाणी, लीलाबाई प्रेमाणी, रितेश दुर्गिया,जठारपेठे येथील रहिवासी कमलाकर सातव, मोठी उमरी येथील रहिवासी सतीश झडपे, अर्जुन कुचेकर आदींनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. त्यांच्या मरणोत्तर नेत्रदानाच्या कार्यामुळे १४ दृष्टिहिनांना दृष्टीलाभ मिळाला आहे. नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला नेत्रदान व नेत्ररोपण संशोधन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: 7 people have died in the past. Eye donation