बोरगाव मंजू येथे १७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:15+5:302021-01-13T04:47:15+5:30
संजय तायडे बोरगाव मंजू : अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या बोरगाव मंजू येथे ...

बोरगाव मंजू येथे १७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात!
संजय तायडे
बोरगाव मंजू : अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या बोरगाव मंजू येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येथील ग्रामपंचायतीत १७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात असून १४,७६९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे ग्रा. पं. मध्ये प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी होणार आहे. ग्रामपंचायतीत ६ प्रभागांतून १७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने गावात प्रचाराला वेग आला आहे. सध्या उमेदवार हेवेदावे विसरून मतदान करण्याची विनवणी करीत असल्याचे दिसून येत आहेत. यंदा निवडणुकीत तीन पॅनलच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांची संख्या लक्षात घेता पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, गावात तिरंगी लढतीचे चित्र आहे. गावात रॅलीसह उमेदवार मतदारांना साकडे घालत आहेत. गावातील सर्व प्रभागांत उमेदवारांनी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. (फोटो इलेक्शन)