नदीकाठच्या ६५ गावांना पुराचा धोका!
By Admin | Updated: May 24, 2017 01:19 IST2017-05-24T01:19:47+5:302017-05-24T01:19:47+5:30
मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नदीकाठच्या ६५ गावांना पुराचा धोका!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मान्सून कालावधीत जिल्ह्यात नदीकाठची ६५ गावे पुरामुळे बाधित होणारी असून, पुराचा धोका असलेल्या या गावांमध्ये मान्सूनपूर्व तयारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व संबंधित यंत्रणांना सोमवारी दिले.
जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात नदीकाठची ६५ गावे पुरामुळे बाधित होणारी असल्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यातील १२, अकोट तालुक्यातील ९, बार्शीटाकळी तालुक्यातील ८, बाळापूर तालुक्यातील ८, पातूर तालुक्यातील १०, तेल्हारा तालुक्यातील ८ व मूर्तिजापूर तालुक्यातील १० गावांचा समावेश आहे. पुरामुळे बाधित होणाऱ्या या गावांमध्ये मान्सूनपूर्व करावयाच्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सातही तालुक्यातील तहसीलदारांसह संबंधित यंत्रणांना दिल्या.
पुरामुळे बाधित होणारी अशी आहेत गावे!
अकोला तालुका: म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु., कुरणखेड.
पातूर तालुका: पास्टुल, भंडारज खुर्द, आगीखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु., सस्ती, तुलंगा.
मूर्तिजापूर तालुका: हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापुरा, हिवरा कोरडे, लाखपुरी.
बार्शीटाकळी तालुका: चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खुर्द, टाकळी.
अकोट तालुका: केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी.
तेल्हारा तालुका: मनात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद.
बाळापूर तालुका : वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरुण.