६४ खेडी खांबोरा पाणीपुरवठा योजनेचे पाणी न साेडल्यास आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:24+5:302021-03-19T04:18:24+5:30
यातून काही निश्चित मार्ग काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी चर्चेअंती सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना ...

६४ खेडी खांबोरा पाणीपुरवठा योजनेचे पाणी न साेडल्यास आंदोलन!
यातून काही निश्चित मार्ग काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी चर्चेअंती सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्या वेळी त्यांनी, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करू, त्यासाठी लोकांनी पाणीकराचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. २० मार्चपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर २२ मार्च रोजी घुसर येथे रस्त्यावर उतरून जि. प. प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जि.प. सदस्य गोपाल दातकर, अप्पू तिडके, तालुकाप्रमुख विकास पागृत, सर्कलप्रमुख लकी गावंडे, प्रीतिमेश म्हातुरकर सुनील पाटील, दीपक पागृत, गजाननराव गावंडे, विनोद वाकडे, भालचंद्र पागृत, विजय पागृत, शरद पवार, अविनाश राऊत, करण चाकोते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.