अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यासाठी ६० बस फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:56+5:302021-05-30T04:16:56+5:30

...तर वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता दोन-अडीच महिन्यापासून कोरोनामुळे एसटीची प्रवाशी वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू आहे. मध्यंतरी ...

60 bus trips to Amravati, Yavatmal, Buldana districts | अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यासाठी ६० बस फेऱ्या

अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यासाठी ६० बस फेऱ्या

...तर वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता

दोन-अडीच महिन्यापासून कोरोनामुळे एसटीची प्रवाशी वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू आहे. मध्यंतरी कडक निर्बंधांमुळे १३ दिवस फेऱ्या बंद होत्या. आता हळूहळू फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. जून महिन्यात निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यास एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.

अकोला विभागातून सुटणाऱ्या फेऱ्या

अकोला-अमरावती ७, अकोट-अमरावती ६, अकोला-परतवाडा ६, वाशिम-अमरावती ६, अकोला-बुलडाणा ६, अकोला-खामगाव ८, अकोला-शेगाव ८, अकोला-यवतमाळ ६, अकोला-दिग्रस ६ फेऱ्या सोडण्यात येणार आहे.

औरंगाबाद फेरीही सुरू होणार

इतर जिल्ह्याप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यात जाण्यासाठी लवकरच बस फेरी सुरू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली आहे. याव्यतिरिक्त बसस्थानकावर पुरेशा प्रमाणात प्रवासी उपलब्ध झाल्यास बसेस सोडण्यात येणार आहे.

सोडण्यात येणाऱ्या फेऱ्या

६०

परत येणाऱ्या फेऱ्या

५८

Web Title: 60 bus trips to Amravati, Yavatmal, Buldana districts