आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जी; मूर्तिजापूर नगर परिषदेतील ६ कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:04 IST2021-05-25T18:04:29+5:302021-05-25T18:04:46+5:30
Murtijapur Municipal Council : आपत्ती व्यवस्थापनात अक्षम्य हलगर्जी केल्याबाबत ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी एका आदेशान्वये मंगळवारी निलंबित केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जी; मूर्तिजापूर नगर परिषदेतील ६ कर्मचारी निलंबित
मूर्तिजापूर : येथील नगरपरीषद कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात अक्षम्य हलगर्जी केल्याबाबत ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी एका आदेशान्वये मंगळवारी निलंबित केले आहे.
शहरात कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षात घेता नगर परिषद कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून वळती केली आहे. अत्यावश्यक सेवा असताना कर्मचारी पुर्व परवानगी नघेता सतत गैरहजर राहणे, वरीष्ठाच्या आदेशाचे पालन नकरणे परस्पर सुटीचे अर्ज सादर करुन कार्यालय सोडून निघून जाणे यामुळे मान्सून पूर्ण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास खोळंबा निर्माण आहे आदी कारणे समोर करुन प्रेमेंद्र चौधरी (शिपाई ), शिवा दिपक बोयत (सफाई कामगार), नारायण दिनेश पावाल (सफाई कामगार), हरी दुधडे (सफाई कामगार), सतीश खंडारे (सफाई कामगार) व महादेव फावडे (सफाई कामगार) या ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी २५ मे रोजी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ७९ महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे तरतूदी नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. तसेच सदर आदेश अमलात असेल त्या कालावधीमध्ये मुख्याधिकारी नगर परिषद मूर्तिजापूर, यांच्या पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही व निलंबित काळात स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी करणे अनिवार्य राहिल असेही आदेशात म्हटले आहे.
दोन शिक्षकांची वेतन कपात
आपती व्यवस्थापनाच्या कामात निष्काळजी केल्यामुळे रेहानाबी असलम खा, मुख्याध्यापिका
मौलाना अबुल कलाम आझाद नप उर्दू शाळा मूर्तिजापूर, प्रभाकर शिरसाट सहायक शिक्षक जे. बी.नप हिंदी विद्यालय मूर्तिजापूर उपरोक्त दोन्ही शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. तर काही शिक्षकांना तशा सुचना देण्यात आल्या, तीन महिन्यांपूर्वी याच कारणावरून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते हे विशेष.