५५0 अधिकारी-कर्मचार्‍यांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:11 IST2017-08-28T01:11:13+5:302017-08-28T01:11:18+5:30

अकोला - जिल्हय़ात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला असून, या उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलीस अधीक्षकांसह ४८ अधिकारी व ४७६ पोलिसांनी रस्त्यावर उतरून  ८0 निगराणी बदमाश तर २५ फरार असलेल्या आरोपींना पकडले. यावेळी एक हजारांवर वाहनांवर कारवाई करण्यात आली.

550 officials-employees Rabweel Combing Operation | ५५0 अधिकारी-कर्मचार्‍यांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

५५0 अधिकारी-कर्मचार्‍यांनी राबविले कोम्बिंग ऑपरेशन

ठळक मुद्दे१0५ आरोपींवर कारवाईहजारांवर वाहनांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - जिल्हय़ात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला असून, या उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलीस अधीक्षकांसह ४८ अधिकारी व ४७६ पोलिसांनी रस्त्यावर उतरून  ८0 निगराणी बदमाश तर २५ फरार असलेल्या आरोपींना पकडले. यावेळी एक हजारांवर वाहनांवर कारवाई करण्यात आली.
 कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी जिल्ह्यात ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा आदेश दिला. त्यानुसार जिल्हय़ातील पोलीस अधिकार्‍यांनी तयारी केली. मात्र, रात्री अचानक जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकही रस्त्यावर उतरले व पोलिसांचे कशापद्धतीने काम सुरू आहे, या संदर्भात तपासणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरनगर पोलीस चौकीजवळ भेट दिली. त्यानंतर कलासागर यांनी सिटी कोतवालीच्या हद्दीत अनेकांची चौकशी केली. अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी ग्रामीणमध्ये अकोटला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस चौकी तसेच अनेक ठिकाणाची स्वत: तपासणी केली. 
रात्री १0 ते २ वाजेपयर्ंत राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, विशेष पथकाचे प्रमुख, ठाणेदार व ४७६ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. 

अशी झाली कारवाई
ऑपरेशन ऑल आउटमध्ये ११४५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ११६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. २५ आरोपींचा शोध घेण्यात आला व आठ आरोपींना अटक केली. चार गुन्हेगारांवर कारवाई करून, रात्रीदरम्यान सुरू असलेल्या १२ प्रतिष्ठानांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, तर ७२ वॉरंट तामील करण्यात आले असून, २५ इसमांवर कारवाई करण्यात आली. 

या तडीपारांचा समावेश
शुभम संजय गवई रा. इराणी झोपडपट्टी, गोपी दुर्गाप्रसाद शर्मा रा. हिंगणा फाटा, दुर्गेश गजानन राऊत शिवसेना वसाहत, दिनेश गजानन कावळे लहान उमरी यांना शहरातून, तर अकोटमधून सचिन गजानन तेलगोटे रा. खानापूर वेस अकोट याला तडीपार करण्यात आले, असताना तो शहरात आढळला.

Web Title: 550 officials-employees Rabweel Combing Operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.