५५ वर्षीय वृद्ध महिलेजवळील आभूषण पळविले! जय हिंद चौकातील घटना
By सचिन राऊत | Updated: April 21, 2024 23:46 IST2024-04-21T23:46:18+5:302024-04-21T23:46:41+5:30
जुने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५५ वर्षीय वृद्ध महिलेजवळील आभूषण पळविले! जय हिंद चौकातील घटना
सचिन राऊत अकोला: जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील ५५ वर्षीय वृध्द महिला रस्त्याने पायी जात असताना चौकामध्ये अज्ञात भामट्यांनी हातचलाखी करून तिच्याजवळील आभूषण लंपास केल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी जुने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजीबाई राजू सारवान (५५) रा. शिवाजीनगर, वाल्मीक चौक येथील रहिवासी असून, त्या जुने शहरातील जय हिंद चौकातून सिटी कोतवालीकडे रस्त्याने पायी जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील कानातील टॉप्स वजन अंदाजे दोन ग्रॅम, गळ्यातील मण्याची पोत अंदाजे २० मणी वजन अंदाजे दोन ग्रॅम व अर्ध्या ग्रॅमचे ताबित असे एकूण १३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दाग-दागिने लंपास केले. ही घटना श्री जागेश्वर अंबिका संस्थान प्रवेशद्वाराच्या आतमध्ये घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये रजीबाई सारवान यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.