वीज पडून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 11:42 IST2021-03-21T11:42:12+5:302021-03-21T11:42:18+5:30

55-year-old woman dies in lightning strike अंजनी बुद्रूक येथील ५५ वर्षीय कासाबाई उत्तम नागोलकर या महिलेचा मृत्यू झाला.

55-year-old woman dies in lightning strike | वीज पडून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

वीज पडून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यात १९ मार्च रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून अंजनी बुद्रूक येथील ५५ वर्षीय कासाबाई उत्तम नागोलकर या महिलेचा मृत्यू झाला.
मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात १९ मार्चला रात्री अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या दरम्यान मेघगर्जनाही मोठ्या प्रमाणावर होत होत्या. त्यातच अंजनी बुद्रूक येथे शेतात राहत असलेल्या ५५ वर्षीय कासाबाई नागोलकर यांच्या अंगावरही या वादळी पावसादरम्यान वीज कोसळी. त्यात गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. डोणगाव परिसरात कांदा, भाजीपाला पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातही अनेक भागात गारपीट झाली आहे.

Web Title: 55-year-old woman dies in lightning strike